काकांनी जपलेली सामाजिक बांधिलकी हि एक आदर्श ठेव – श्री संतोष कुंभार अध्यक्ष शाहुवाडी पत्रकार संघ
मलकापूर प्रतिनिधी : सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बँकिंग क्षेत्रात कुरुंदवाड अर्बन च्या माध्यमातून दिवंगत श्रीपाद आलासे (काका ) यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. असे मत प्रतिपादन शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुंभार यांनी केले.
ते मलकापूर येथील कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी दिवंगत श्रीपाद आलासे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मलकापूर तालुका शाहुवाडी इथं कुरुंदवाड अर्बन बँकेचे संस्थापक संचालक स्व. श्रीपाद आलासे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दिनानाथ सक्रे, माजी उपनगराध्यक्ष भारत गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संतोष कुंभार पुढे म्हणाले कि, या भागातील ग्राहक महत्वपूर्ण ठरत आहे. भविष्याचा वेध घेत दिवंगत श्रीपाद आलासे यांनी जपलेली बांधिलकी हि एक आदर्श ठेव आहे. कुरुंदवाड अर्बन बँकेच्या माध्यमातून शाहुवाडी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना अधिक लाभ होईल.
शाखाधिकारी भाऊसो पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून, उपस्थितांना बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, बी. वाय. पाटील पतसंस्थेचे व्हा.चेअरमन संपतराव पाटील, सुरेश पोतदार, रंगराव जामदार, बबलू गुजर, अशोक जाधव, आर.एन. पाटील, जुबेर पटेल, यांच्यासह बँकेचे कर्मचारी कुलकर्णी, खामकर, खोत, मिलिंद भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.