खा. धैर्यशील माने यांच्या फंडातून फकीरवाडी पेविंग ब्लॉक कामाचे उद्घाटन संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील फकीरवाडी येथील पीर खादीर साहब दर्गा येथे पेविंग ब्लॉक कामाचे उद्घाटन करण्यात आले. हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम करण्यात आले.

यासाठी फकीरवाडी चे माजी सरपंच अमोल दशवंत, नदीम पिरजादे, निवृत्त पोलीस अधिकारी बाबासो मुल्ला यांच्या विशेष पाठपुराव्याने व शिवसेना शिराळा शहर प्रमुख निलेश आवटे, शिवसेना शिराळा तालुकाप्रमुख अॅड. प्रदीप जोशी शिवसेना उपतालुकाप्रमुख सतीश काटे यांच्या प्रयत्नातून बरेच दिवस प्रलंबित असणाऱ्या पीर कादिरसाब दर्गा येथील परिसराचे सुशोभीकरण व पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम खासदार धैर्यशील माने दादा यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. यासाठी लागणारा निधी जन सुविधा योजने मधून जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन निधीमधून मंजूर करण्यात आला.

सदरच्या कामाचे उद्घाटन माजी सरपंच चिरंजीव अमोल दशवंत, उपसरपंच मुबारक मुल्ला, बाबासाहेब मुल्ला, जगन्नाथ देसाई, अब्दुल रझाक, पिरजादे गौस, मोहद्दीन पिरजादे, अब्दुल रजाक, अब्दुल कबीर पिरजादे, बाबासाहेब पिरजादे ,अल्लादिन पिरजादे , जगन्नाथ देसाई ,जैनुल पिरजादे, तसेच शिवसेना शिराळा शहर प्रमुख निलेश आवटे शिवसेना उपतालुकाप्रमुखख सतीश काटे, विभाग प्रमुख शरद नाईकवडी आदींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.