पर्यावरण संतुलनासाठी तरुणाईची गरज – श्री मुरली कृष्णा ( हिंदुस्तान पेट्रोलियम कोर्पोरेशन )
शिराळा प्रतिनिधी : आपण झाडांना वाचवले तर, झाडे आपल्याला वाचवतील. त्यामुळेच झाडे लावली पाहिजेत, आणि जगवली पाहिजेत. प्रदूषणाने श्वास गुदमरतो आहे. त्यामुळे आपले पर्यावरणच आपल्याला वाचवू शकते, असे प्रतिपादन हिंदुस्तान पेट्रोलियम कोर्पोरेशन चे सांगली जिल्हा विक्री अधिकारी श्री. मुरली कृष्णा यांनी केले.

शिराळा येथील श्री.सद्गुरू प्राथमिक व माध्यमिक निवासी विद्यालयात आयोजित हिंदुस्थान पेट्रोलियम च्या स्थापना दिवस व वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाजन उद्योग समूहाचे प्रमुख श्री. सुमंत महाजन अध्यक्ष स्थानी होते. प्रारंभी सरस्वती व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. मुरली कृष्णा पुढे म्हणाले कि, बदलती जीवनशैली समाजासाठी घातक आहे. आपल्या परिसराची स्वच्छता, हा आपला श्वास असावा, परंतु हाच श्वास आत्ता गुदमरतो आहे. याचे समाजाला भान नाही. बेसुमार होणारी वृक्षतोड, प्लास्टिक चा अनावश्यक वापर यामुळे प्रदूषण वाढत आहे. वृक्ष संगोपन व पर्यावरण संतुलन साठी तरुणांनी पुढाकार घेतला, तर यामधे एक क्रांती होऊ शकते. असे त्यांनी प्रतिपादन केले.

श्री. मुरली कृष्णा यांनी गॅस सुरक्षितपणे वापराचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांसमोर सादर केले. व गॅस वापराचे फायदे याची माहिती दिली.
महाजन गॅस संचालिका सौ. सुखदा महाजन म्हणाल्या कि, पर्यावरणाचा समतोल राहायचा असेल, तर जास्तीत जास्त झाडे लावून, त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. त्यासाठी या मुलांना रोपे व सिड बॉल देऊन, त्यातील झाड चांगले वाढवणाऱ्या विद्यार्थांना बक्षीस दिले जाणार आहे. गेली पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबवला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी श्री. मुरली कृष्णा यांचा यथोचित सत्कार श्री. सुमंत महाजन यांच्या हस्ते झाला. तसेच विद्यार्थ्यांना विविध रोपांचे व सिड बॉल चे वाटप करण्यात आले. ते त्यांनी आपल्या शेतात, डोंगर भागात लावून, त्याचे जतन करायचे आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात होणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत त्यांना गौरविण्यात येणार आहे.

श्री. मुरली कृष्णा यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे माध्यमिक चे मुख्याध्यापक बी. डी. पाटील , आर. डी. नलवडे, विलास निकम, व्ही, ए.उगरे, दीपक पवार, डी. डी. चव्हाण, वी. एस.पाटील, आर.बी.शिंदे,सौ. कोकाटे मॅडम. उपस्थित होते.

महाजन गॅस चे संचालक श्रेयस महाजन, किशोर पवार, महेश कुलकर्णी, राजेश चौगुले, पांडुरंग जाधव, शिवाजी पाटील, मनोहर खिलारे, ऋतिक गायकवाड, रणजित परीट, रुपेश दरगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन विलास निकम यांनी केले तर आभार व्हीं. एस पाटील सरांनी मानले.