मलकापूर मध्ये श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न
मलकापूर प्रतिनिधी : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त श्रीं च्या मूर्तीस सकाळी अभिषेक करण्यात आला.

हा अभिषेक श्री निर्मलानंद स्वामी, पुरोहित ओंकार जोशी यांच्या मंत्रोच्चारात सौ. व श्री खटावकर, अनिकेत हिरवे व समाज बांधव, राजाई महिला मंडळ भक्तजन, वारकरी संप्रदाय यांनी केला.
सकाळी १०.०० वाजता पालखी दिंडी सोहळ्यासाठी श्री विठ्ठल भक्त भजनी मंडळ, अमोल नागवेकर, आण्णा ओतारी, दस्तगीर अत्तार, बाबासाहेब पाटील, बंडू पेटकर, रवींद्र खुर्द, सौ. अनुराधा अ. हिरवे, श्रीमती संजीवनी आणेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी गुणवंत विद्यार्थी पृथ्वीराज खटावकर, अनिकेत खटावकर, हर्ष तांदळे यांचा सत्कार करण्यात आला.

दुपारी १२.०० वा. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशांत खटावकर अध्यक्ष, प्रकाश मिरजकर उपाध्यक्ष, सुभाष कोळेकर, अमर खटावकर, नंदू वर्णे, ओंकार खुर्द, सुशांत तांदळे, संतोष भस्मे, अभिजित खटावकर, सागर तांदळे, प्रदीप विंचू, अशोक खटावकर, व सहकारी यांनी विशेष योगदान दिले.