शिराळा नगरपंचायत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांचा निरोप समारंभ संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा नगरपंचायत कडील कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रीमती अर्चना वसंतराव गायकवाड यांची बदली वडगाव नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर येथे झालेने शिराळा नगरपंचायतीने निरोप समारंभाचे आयोजन केले.

यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.योगेश बाळकृष्ण पाटील यांनी श्रीमती अर्चना गायकवाड यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार केला. त्यांनी केलेले उत्कृष्ट कामांचा थोडक्यात आढावा सांगून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगरपंचायत कडील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन त्यांना सदिच्छा दिल्या .