शिराळ्यातील नागपंचमी चा प्रश्न मार्गी लागेल – आमदार बच्चू कडू
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):. परंपरागत चालत आलेल्या गोष्टी सरकारने जपल्या पाहिजेत. भाजप सरकार हे संस्कृतीला जपणारे सरकार आहे. शिराळ्यात नागाला कोणतीही इजा केली जात नाही अथवा मारले जात नाही. त्यामुळे सरकार यावर मार्ग काढेल, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिराळा येथे प्रहार संघटनेचे शिराळा तालुकाध्यक्ष श्रीराम नांगरे यांच्या घरी दिलेल्या भेटी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी आमदार कडू म्हणाले कि, सर्वत्र पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात घट झाली तर, त्यांना सरकार मदत करेल. आपली जनावरे वन विभागाच्या हद्दीत जातात, त्यावेळी अनेक कायदे लावले जातात. गुन्हे दाखल केले जातात. पण त्यांची जनावरे आपल्या हद्दीत येतात, त्यासाठी मात्र कोणताही कायदा नाही. याच्यावर आता काम करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होण्याची गरज आहे. मुख्यमंत्री शिंदेंची विकासाची गती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नीती या संगमामुळे तिसरे इंजिन अपोआप जोडलं गेलं. यामुळे सरकारला मजबुती मिळाली .

नाराजी नाही, पण शिवसेनेच्या सर्व आमदारांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अर्थमंत्रीपद देवू नका, असा आमचा सूर होता. त्यावेळी मुख्यमंत्री वेगळे होते, आता मी आहे. त्यामुळे आता मागे झाले तसे होणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे अर्थमंत्री पवार असले काय आणि कोणी ही असलं तरी आम्हाला काय फरक पडणार नाही. कारण आमचं प्रहार आहे. आता कॉंग्रेस ही सत्तेत सहभागी होईल . कारखान्यांच्या काट्याचा व एफ.आर.पी ठरवताना फक्त साखर उत्पादन विचारात न घेता इतर उपपदार्थ निर्मिती होते. त्याचे ही उत्पादन गृहीत धरून एफ.आर.पी ठरवली पाहिजे . याबबत विधानसभेत लक्षवेधी मांडणार आहे. मी मंत्रिपद घ्यायचे कि नाही याबाबत १८ जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करून निर्णय जाहीर करणार आहे. कारखाण्यातून तयार होणाऱ्या मालाचे दर वाढले, तर कोण काय बोलत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या मालाचे दर वाढले तर सर्वजण ओरडतात अशा प्रवृतीचा आम्ही निषेध करतो.

यावेळी प्रहार संघटनेचे शिराळा तालुकाध्यक्ष श्रीराम नांगरे , अक्षय क्षीरसागर ,ऋषी घोडे, अजिंक्य कोळी, ऋषिकेश गायकवाड, शशिकांत पाटील, दिग्विजय पाटील, अनुसया पाटील, सुनिता कांबळे उपस्थित होते.