पत्रकार संघाच्या वतीने संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार यांचा सन्मान संपन्न
बांबवडे : शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार यांचा रोप श्रीफळ, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषद च्या वतीने आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला. या अनुषंगाने हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष संतोष कुंभार होते.

यावेळी श्री कुंभार यांनी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद पवार यांच्या कारकीर्दीबाबत नवोदित पत्रकारांना माहिती दिली.
यावेळी सुभाष बोरगे, संजय जगताप यांनी मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी मुकुंद पवार यांनी सत्काराबद्दल संघाचे आभार व्यक्त केली.या कार्यक्रमास पत्रकार संघाचे सदस्य डॉ. डी.आर.पाटील, चंद्रकांत शेळके, नथुराम डवरी, दशरथ खुटाळे, शाम पाटील, प्रकाश पाटील कडवेकर, रोहित पास्ते यांच्यासोबत अनिल पाटील यांची देखील उपस्थिती होती.