बांबवडे पोलीस चौकी च्यावतीने मुकुंद पवार यांचा सन्मान
बांबवडे :बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषद च्या वतीने आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल बांबवडे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रसाद कोळपे साहेब व येथील पोलीस कर्मचारी बाबासाहेब चौगुले, तसेच शिवाजी पाटील यांनी त्यांचा चौकीत बुके देवून सन्मान केला. तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुकुंद पवार म्हणाले कि, पोलीस आणि पत्रकार हे एकाच उद्देशाने समाजात काम करीत असतात. त्या समाजासाठी जमेल ते सहकार्य आम्ही पोलिसांना करत आलो आहोत. भविष्यात देखील करणार. कारण आपण समाजासाठीच पत्रकारिता करीत असतो. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.