यशराज ऑप्टीकल्स चे मयूर कदमबांडे यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
बांबवडे : यशराज ऑप्टीकल्स चे मयूर कदमबांडे यांना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ” यशराज ऑप्टीकल्स ” हे चष्म्याचे दुकान गेली १५ वर्षे कार्यरत आहे. ओंकार व मयूर कदमबांडे हे दोन्ही बंधू एकत्र हा व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. मराठी माणूस व्यवसायात आणि एकत्ररीत्त्या काम करताना क्वचितच आढळतात.
त्यापैकी मयूर कदमबांडे हे धाकटे बंधू आहे. त्यांचा वाढदिवस काल संपन्न झाला. व्यवसाय करताना हे दोन्ही बंधू कष्टाला कधीही कमी पडले नसून, यांच्या कामात समन्वय आढळून येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यवसायाचा आलेख चढता राहावा, या सदिच्छा एसपीएस न्यूज च्यावतीने मुकुंद पवार यांनी व्यक्त केल्या आहे