विनोद चौगुले व परिवाराच्या वतीने मुकुंद पवार यांचा यथोचित सत्कार
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील विनोद चौगुले आणि परिवाराच्या वतीने शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार यांचा शाल, फेटा, पेढे, बुके देवून घरगुती पण मोठ्या मानाचा सत्कार केला. मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषद च्यावतीने आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला आहे. यानिमित्त या सत्काराचे आयोजन चौगुले परिवाराने केले होते.

चौगुले परिवारातील श्री चौगुले गुरुजी, बाळासाहेब चौगुले, उद्योगपती तानाजीराव चौगुले, अभयसिंगराव चौगुले, विनोद चौगुले, विजय चौगुले, लोकनियुक्त सरपंच भगतसिंगराव चौगुले, संग्राम चौगुले, शरद चौगुले व सर्व कुटुंबीय या सत्काराला आवर्जून उपस्थित होते.

यावेळी चौगुले परिवाराने केलेल्या सत्काराबद्दल मुकुंद पवार यांनी चौगुले गुरुजी आणि सर्व बुजुर्ग मंडळींचे आशीर्वाद घेतले, तसेच चौगुले परिवाराने केलेल्या आपुलकीच्या सत्काराबद्दल त्यांचे आभार मानले.