एक अभ्यासू, आणि विविधांगी लेखन करणारे पत्रकार म्हणजे डॉ. डी.आर.पाटील सर
बांबवडे : पत्रकारिता हि समाजोपयोगी असावी. आपल्या बातमीमुळे समाजाला माहिती तर मिळावीच, परंतु बातमी मागची बातमी काय असते, हे सुद्धा समाजाला कळले पाहिजे. हे सुद्धा एका पत्रकाराचे कर्तव्य असते. हे सर्व गुण आपल्याला दैनिक सकाळ चे पत्रकार डॉ. डी.आर. पाटील यांच्या पत्रकारितेतून पहायला मिळेल.

एक व्यासंगी, अभ्यासू, आणि वेचक बातम्या लिहिण्यासाठी डी.आर. पाटील हे प्रसिद्ध आहेत. अनेक अभ्यासू विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. नुकतीच त्यांची नव्या निर्माण होणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आधारित सहा भागांची मालिका नुकतीच प्रकाशित झाली आहे.

या मालिकेत त्यांनी या महामार्गाच्या ऐतिहासिक मार्गावर दृष्टीक्षेप टाकला आहे. इंग्रजांच्या काळात हा महामार्ग आंतरराष्ट्रीय महामार्ग म्हणून प्रसिद्ध होता. यावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन करून शाहुवाडी तालुक्यातील अभ्यासू पत्रकार म्हणून नाव कमावलेले आहे.

अशी व्यासंगी आणि अभ्यासू प्रतिमा डॉ.डी.आर. पाटील यांची आहे. त्यांनी याचबरोबर दुग्धव्यवसाय यावर देखील त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे अशा विविधांगी लेखन करणाऱ्या व्याक्तीमात्वाला निश्चितच मानाचा सलाम.