डॉ. शैलेश माने अनंतोत्सव पुरस्काराने सन्मानित
शिराळा प्रतिनिधी : शिराळा येथील साई हाँस्पिटलचे आँर्थोपेडीक सर्जन डाँ. शैलेश माने यांना वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल अनंतोत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जागतिक प्लास्टिक सर्जरी डे चे औचित्य साधून, कोल्हापूर येथे रेसिडेन्सी क्लबच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डाँ. किरण दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजस्थान , जोधपूर येथील सवाई मानसिंग वैद्यकीय महाविद्यालयाचे प्लास्टिक सर्जरी विभाग प्रमुख डाँ. प्रदीप गोईल यांची प्रमुख उपस्थिती होती.

वैद्यकीय क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनिय काम केले आहे. तसेच रूग्णांना योग्य मार्गदर्शन व सल्ला देवून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. अशा डाँक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे नियोजन कोल्हापूर येथील अनंत प्लास्टिक सर्जरीचे डाँ. मयुरेश देशपांडे व डाँ. तन्वी देशपांडे यांनी केले होते.

या कार्यक्रमासाठी डाँ. संदीप पाटील, डाँ. रणजित मिरजे, डाँ. शिला माने, अजित वैद्य, श्रीकांत नानिवडेकर तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी गोखले यांनी केले. डाँ. प्रियांका सावडकर यांनी आभार मानले.