मंत्रालय सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल तेजश्री गुरव यांचा सत्कार
शिराळा / प्रतिनिधी :
कांदे,ता. शिराळा गावच्या सुकन्या तेजश्री जयवंत गुरव यांची मंत्रालय सहाय्यक पदी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मधून निवड झाल्याबद्दल गुरुवारी चिखली येथील आनंदराव नाईक सहकारी पतसंस्थे तर्फे त्यांचा सत्कार संस्थेचे संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.

कुमारी तेजश्री ही कांदे येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संगणक विभागातील कर्मचारी जयवंत गुरव यांची कन्या आहे.

यावेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष गजानन सोनटक्के म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधे गुणवत्ता अधिक आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक छोट्या-मोठ्या गावातील मुले वेगवेगळ्या मुद्द्यावर अधिकारी म्हणून जात आहेत. शिराळासारख्या डोंगरी भागातून या निवडी होत आहेत. या गोष्टीचा मोठा अभिमान आहे. कुमारी तेजस्वी हिला संस्थेच्या वतीने अनेक शुभेच्छा असून, भविष्यात तिला पुढील वाटचालीसाठी संस्थेमार्फत लागेल ती मदत करण्यात येईल.

याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक तानाजीराव कुरणे, रामचंद्र चौगुले, आगाशीव बिऊरकर, दादासो पाटील, राजाराम माने, जयवंत गुरव, अनिता गुरव आदी उपस्थित होते.