साळशी चे सरपंच आनंदराव पाटील यांनी मुकुंद पवार यांचा केला सत्कार
बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी गावचे सरपंच श्री. आनंदराव पाटील आणि वसंतराव पाटील यांनी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद पवार यांना आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी जावून, त्यांचा बुके, शाल देवून सत्कार केला.

श्री आनंदराव पाटील हे अभ्यासू सरपंच असून, व्यक्तिगत रीत्त्या अनेक मुद्द्यांवर त्यांचा चांगला अभ्यास आहे. गावातील तलाव स्त्रोत खोलवले, तर पंचक्रोशीत मुबलक पाणी मिळेल, अशी त्यांची खात्री आहे. शासनाच्या निधीचा तलाव खोलवाण्यासाठी वापर करावा, अशी त्यांची मागणी आहे. त्याला निधी सुद्धा कमी लागेल, असेही त्यांचे मत आहे. अशा अनेक मुद्द्यांवर त्यांचा अभ्यास आहे.

मुकुंद पवार यांनी सरपंच आनंदराव व वसंतराव यांचे आभार मानले.