जिद्द, चिकाटीने केलेले यश हे गौरवशाली असते – सौरभ शेट्टी (स्वाभिमानी विद्यार्थी परिषद
शाहुवाडी प्रतिनिधी : संघर्षावर मात करीत, परिस्थितीची जाणीव ठेवून, स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश हे इतरांच्या समोर आदर्शवत ठरत असल्याचे, प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी परिषदेचे प्रमुख सौरभ शेट्टी यांनी मलकापूर इथं केले.

मलकापूर तालुका शाहुवाडी येथील पीएसआय पदी अमित कुंभार यांची निवड झाली आहे. त्यांच्या सत्कार प्रसंगी सौरभ शेट्टी बोलत होते.

यावेळी बोलताना सौरभ शेट्टी पुढे म्हणाले कि, जीवनामध्ये अनेक चढ उतार येत असतात. आपल्या मनाची एकाग्रता, आणि ध्येयाशी एकनिष्ठ राहून, केलेले प्रयत्न निश्चितच यशोशिखरावर पोहोचवतात. परिस्थितीची जाणीव आणि वेळेचे भान ठेवून, वाटचाल केली, तर नक्कीच आपण यशोशिखर गाठू शकतो. विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास आणि चिकाटी याचा समन्वय साधून अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

दरम्यान सौरभ शेट्टी यांनी अमित कुंभार व त्यांची आई मंगल कुंभार या दोघांचा विशेष गौरव केला.

याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, किसन चांदणे, किरण घेवदे, साळशी ग्रामपंचायत सदस्य पद्मसिंह पाटील, प्रशांत पाटील, भैय्या थोरात, अमित साळुंखे, पार्श्व पाटील, ऋषिकेश गायकवाड, ओंकार केसरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.