डोंगर कपारीतील तरुण व्यवस्थेकडून नाडला जातोय, : आम्ही मदत करू – सौरभ शेट्टी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी अनेक दाखल्यांसाठी नडवले जात आहे. हि परिस्थिती बदलणे , हि काळाची गरज आहे. कारण डोंगर कपारीतील हा तरुण जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करीत असतो, आणि काही दाखल्यांसाठी महा ई सेवा केंद्र, सेतू, तहसीलदार कार्यालय विद्यार्थ्यांना नडत आहे. हि परिस्थिती निश्चित बदलेल, यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. असे मत स्वाभिमानी विद्यार्थी परिषद चे प्रमुख सौरभ शेट्टी यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरण्यासाठी डोमॅशिअल सर्टिफिकेट, सारखे अनेक दाखले जोडावे लागतात. हे दाखले मिळवण्यासाठी महा ई सेवा केंद्र, सेतू, तहसीलदार कार्यालय यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते. हे सर्व थांबवण्यासाठी आम्ही स्वत: हे दाखले तहसीलदार कार्यालयाकडून मोफत मिळवून देणार आहोत.

ज्या विद्यार्थ्यांना हे दाखले मिळवण्यास अडचणी येतात, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मी त्यांना लवकरात लवकर आणि मोफत दाखले मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहे. असेही श्री सौरभ शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले. यासाठी मो. क्र. ७७४५००७२२७ यावर संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा सौरभ शेट्टी यांनी केले.