लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर वर्धापनदिनानिमित्त कु.तेजश्री गुरव यांचा सत्कार व निबंध लेखन स्पर्धा संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चिखली-यशवंतनगर इथं लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर चा १७ जुलै रोजी २२ वा वर्धापन दिन संपन्न झाला. शाळेला २२ जुलै २००१ रोजी मान्यता मिळाली. यानिमित्त शाळेत विविध गटांमधून निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेली शाळेची माजी विद्यार्थिनी तेजश्री गुरव यांचा सत्कार सोहळा देखील यावेळी संपन्न झाला.


इयत्ता १ ली ते ४ थी साठी निबंध विषय १. माझी आई, २. माझी शाळा. ३. छत्रपती शिवाजी महाराज .
इयत्ता ५ वी ते ८ वी. १. माझा आवडता खेळ.२. मोबाईल चे फायदे तोटे .३. मी पक्षी झालो तर . ४. झाडाचे आत्मवृत्त – मी झाड बोलतोय. असे विषय देण्यात आले.
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी यापैकी आपल्या आवडत्या विषयावर निबंधलेखन केले.


नुकत्याच झालेल्या महाराष्ट लोकसेवा आयोग परीक्षेत मंत्रालय सहाय्यक पदी नियुक्त झालेल्या तेजश्री जयवंत गुरव या शाळेच्या माजी विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा संपन्न झाला. शाळेच्या वतीने माजी विद्यार्थिनी कु. तेजश्री गुरव यांचा सत्कार मुख्याध्यापक गवळी सर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कु. तेजश्रीयांचे वडील जयवंतराव व आई हे दोघेही या सत्कार सोहळ्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री खबाले सर यांनी केले.

यावेळी श्री गवळी सर, सौ. भोसले मॅडम, सौ. शिराळकर मॅडम, यांनी मनोगते व्यक्त केलीत. या मनोगतातून कु.तेजश्री यांच्याविषयी कौतुक केले. तसेच त्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्कारमूर्ती तेजश्री यांनी आपल्या मनोगतातून आपल्या शाळे विषयी च्या आठवणी सांगितल्या. तिच्या प्रगती च्या वाटचालीत, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत शाळेचे मोठे योगदान आहे, असेही त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

कार्यक्रमाचे आभार सौ. स्वप्नाली कांबळे मॅडम यांनी मानले. दरम्यान कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना तेजश्री गुरव कुटुंबियांकडून पेढे वाटण्यात आले.