स्वाभिमानी परिषदच्या वतीने सौरभ शेट्टी यांनी केला पत्रकार मुकुंद पवार यांचा सत्कार
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषद च्या वतीने आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने त्यांच्या निवास स्थानी जावून स्वाभिमानी शेतकरी विद्यार्थी परिषद च्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरभ शेट्टी यांनी शाल, फेटा, बुके देवून सत्कार केला.

यावेळी सौरभ शेट्टी यांनी मुकुंद पवार यांचे अभिनंदन करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना व विद्यार्थी परिषदेचे मुकुंद पवार यांनी आभार मानले.

याप्रसंगी सुरेश म्हाऊटकर, भैय्या थोरात, पद्मसिंह पाटील, गुरुनाथ शिंदे, प्रशांत पाटील, अजित साळोखे, ऋषिकेश गायकवाड, पार्श्व पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.