आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी योग करणे गरजेचे – श्री बळवंत फडके
शिराळा प्रतिनिधी: (संतोष बांदिवडेकर): शरीर स्वास्थ्यासाठी योग अभ्यास करावा, असे प्रतिपादन बळवंत फाळके यांनी शिराळा येथे योग परिचय वर्गाच्या पारितोषिक वितरण समारंभ बोलताना केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभाकर जंगम व उदय निकम होते. या वेळी स्वागत व प्रास्ताविक जयश्री बाऊचकर यांनी केले.

या वेळी रविकांत आमणे, विनायक जगताप, उदय निकम, प्रभाकर जंगम यांचा शाल, गुलाब रोपे देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी बोलताना विनायक जगताप म्हणाले की, शिराळा येथे योग परिचय वर्गसाठी चांगला प्रतिसाद मिळाला होता.
या वेळी उदय निकम म्हणाले की, शिराळा तालुक्यात योग प्रसार करण्यासाठी नवीन शिराळा येथील योग शिक्षक काम करावयाचे आहे.

या वेळी पत्रकार विठ्ठल नलवडे, मुख्याध्यापक आशा नलवडे, तेजस्वी शेटे, डॉ विजय यादव, जयश्री बाऊचकर, अरविंद पाटील, प्रतिभा बुद्रुक, नाझीया अत्तार, गौरी यादव, राजश्री पाटील, कल्पना गायकवाड, भक्ती जोशी, वर्षा यादव, रेखा गायकवाड, यांनी मनोगत व्यक्त केले

या वेळी नेत्रा जोशी, वैशाली पाटील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. या वेळी परिचय वर्गातील उत्तीर्ण सर्व साधक यांना प्रमाणपत्र देण्यात आले
सूत्रसंचालन सौ आशा विठ्ठल नलवडे यांनी तर, आभार गौरी यादव यांनी मानले.