ऊस वहातुक अपघातग्रस्त मजुरांना विम्याचा धनादेश आम.मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सुपूर्द
शिराळा प्रतिनिधी : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात तोडणी व वाहतूक मजूरांना अपघात व अपघाती मृत्यूबद्दल त्यांच्या वारसांना विम्याचे धनादेश प्रदान करण्यात आले. हे धनादेश कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, संचालक विराज नाईक, दिनकरराव पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, शेती अधिकारी ए. ए. पाटील व इतर सर्व संचालकांच्या उपस्थितीत देण्यात आले.

सन 2022-23 मधील गळीत हंगामात 25 जानेवारी 2023 रोजी ऊस घेवून ट्रॅक्टर कारखान्याकडे येत असताना, अपघात होऊन दिलीप हणमंत पवार हे चालक मयत झाले होते. त्यांचा कारखान्यामार्फत विमा उतरविण्यात आला होता. त्यापोटी त्यांना 3 लाख रुपये मंजूर झाले होते. त्याचा धनादेश मयताची पत्नी गंगाम्मा दिलीप पवार यांच्याकडे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी धनादेश सुपूर्द केला.

तसेच ऊस तोडणीच्या कामावेळी फळीवरुन पडल्याने, कोयता लागल्यामुळे जखमी झालेल्यांनाही विमा रक्कम मंजूर झाली होती. त्यामध्ये महादेव तुकाराम पाटील (मालेवाडी, ता. वाळवा) यांना 9 हजार तर, बाबासो पांडुरंग खामकर (सरुड, ता. शाहुवाडी) यांना 18 हजार 800 रुपये मंजूर झाले होते. त्यांच्याही धनादेशाचे वाटप यावेळी झाले.