बर्कीकडे न जाण्याचे नागरिकांना, पर्यटकांना आवाहन – श्री राजेंद्र सावंत्रे शाहुवाडी पोलीस निरीक्षक
बांबवडे : बर्की तालुका शाहुवाडी येथील रस्ता पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. तेंव्हा नागरिकांनी तसेच पर्यटकांनी धबधबा पहावयास जावू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सावंत्रे यांनी केले आहे.


येथील बर्की पूल हा पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे बर्की, अनुस्कुरा, करंजफेण हा रस्ता बॅरीकेट लावून बंद करण्यात आला आहे. यांची नागरिकांनी, पर्यटकांनी नोंद घ्यावी. तेंव्हा या रस्त्याकडे कोणीही जावू नये, असे आवाहन देखील शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी केले आहे.