मलकापूर नगरपरिषद व मुस्लीम जमियत यांच्यावतीने कब्रस्तान मध्ये वृक्षारोपण
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर नगरपरिषद, व मुस्लीम जमियत मलकापूर तालुका शाहुवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर येथील मुस्लीम कब्रस्तान येथे वृक्षारोपण करण्यासाठी २०० रोपे देण्यात आली.

मलकापूर नगरपरिषद मलकापूर, च्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ साठी वसुंधरा अभियान ४.० राबविण्यात येणार आहे. या अभियान अंतर्गत शहरात वृक्षारोपण, व सौर यंत्रणेचे काम करण्यात येत आहे.

यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने मलकापूर नगरपरिषद मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी ५०० लिटर ची पाण्याची टाकी समाजाला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित कर्मचारी, मुख्याधिकारी विद्या कदम, महेश गावखंडकर, प्रसाद हर्डीकर, पाटणकर, तंवर, सुनील सोळंकी, जाधव, व नगर परिषद कर्मचारी होते. तसेच मुस्लीम जमियत चे अध्यक्ष सिंकदर जमादार, गुलाब भटारी, इसाक मालदार, जुबेर पटेल, आरिफ नायकवडी, व नागरिक उपस्थित होते. आभार दस्तगीर आत्तार यांनी मानले.