शिराळा मतदारसंघासाठी २५ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी :आम. मानसिंगराव नाईक
शिराळा (प्रतिनिधी) : माझ्या मागणीवरून पावसाळी अधिवेशनात शिराळा विधानसभा मतदार संघात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील २५ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

ते पुढे म्हणाले कि, मी नेहमी शिराळा मतदार संघातील विकासाला प्राधान्य दिले आहे. मतदार संघातील अत्यंत जिव्हाळ्याचे काम म्हणून वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेची शिराळा तालुक्यातील कामे पूर्णत्वास नेली आहे. वाळवा तालुक्यातील कामांना निधी मिळवुन गती दिली आहे. लवकरच ही कामेही पूर्णत्वास जातील. याशिवाय आरोग्याच्या सोईसाठी ठिक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, वीज उपकेंद्र, पुलाची, रस्त्याची कामे पूर्णत्वास नेली आहेत. अनेक पाणंद रस्ते, साकव, सामाजीक मंदिरे, सभामंडप, व्यायाम शाळा, शाळा खोल्या, संरक्षक भिंती, काँक्रीट रस्ते, पर्यटन विकास, पाणी योजना पूर्ण केल्या आहेत. विकासाची ही प्रक्रिया सतत चालू ठेवली आहे. मतदार संघातील नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करून देणे, याला प्राधान्य दिले आहे. अनेक वर्षापासून मागणी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात खालील २५ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी मिळवली आहे.
मंजूर झालेले कामे (कंसात निधीची रक्कम) : मांगरुळ, सागांव, मांगले, चिकुर्डे, ऐतवडे, कुरळप, येलूर, तांदुळवाडी, बहादुरवाडी, ढवळी, बागणी, ते तालुका हद्द रस्ता रा.मा.१५९ कि. मी. ५३ /०० ते ५५ / ५०० मध्ये सुधारणा करणे. ता. वाळवा, जिल्हा सांगली भाग – येलूर ते तांदुळवाडी : (१० कोटी), वाळवा तालुक्यातील कुरळप करंजवडे ठाणापुढे, देववाडी काखे पुलाजवळ कोल्हापूर जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा ११६ कि. मी. ० /०० ते १३ / ८०० मध्ये रस्ता सुधारणा करणे. (भाग करंजवडे फाटा ते ठाणापुडे) : ८ कोटी, वाळवा तालुक्यातील जिल्हा हद्दीपासून कासेगांव, येवलेवाडी, धनगरवाडी बहे रस्ता प्रजिमा क्रं. १६२ कि. मी. ० /०० ते १२ / ८०० मध्ये सुधारणा करणे. (१० कोटी), शिराळा तालुक्यातील जिल्हा हद्द गिरजवडे, शिरशी, मानकरवाडी, अंत्री खुर्द, तडवळे रस्ता प्रजिमा क्रं. १११ ३ / २०० ते ६ / ९०० व ११/४०० ते १२/४०० ते मध्ये सुधारणा करणे. कि. मी. भाग गिरजवडे ते शिरशी व अंत्री खुर्द फाटा ते अंत्री खुर्द : (५ कोटी)

शिराळा तालुक्यातील इंग्रुळ, भाटशिरगाव, कांदे-सावर्डे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रं. ६ कि.मी. ० /०० ते २ / २०० मध्ये सुधारणा करणे. भाग इंग्रुळ ते शिंगटेवाडी : (३ कोटी), शिराळा फकीरवाडी मांगले रस्ता क्रमांक ७ कि.मी. ० /०० ते १ / ४०० मध्ये सुधारणा करणे. भाग – शिराळा ते गोरक्षनाथ मंदिर (५ कोटी), शिराळा तालुक्यातील जिल्हा हद्द गिरजवडे शिरशी, मानकरवाडी, अंत्री खुर्द, तडवळे रस्ता प्रजिमा क्रं. १११ कि. मी. १४/२०० ते १६/००० भाग – अंत्री खुर्द ते तडवळे मध्ये सुधारणा करणे. : (३ कोटी). असे एकूण २५ कोटी रुपये.