सरूड इथं रहात्या घरात गळफास लावून तरुणाची आत्महत्त्या
सरूड प्रतिनिधी : सरूड तालुका शाहुवाडी येथील युवकाने आज दि.२३ जुलै २०२३ रोजी सकाळी दारूच्या नशेत राहत्या घरात गळफास लावून आत्महत्त्या केली आहे. सदर घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाणे इथं करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरूड येथील शिवानंद राजू कांबळे वय २८ वर्षे याने रहात्या घरात दोरीने गळफास लावून घेवून आत्महत्त्या केली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यानंतर शव, शवविच्छेदन करिता मलकापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात्देण्यात आले.