महिलांसाठी अमुल्या योजनेसाहित अनेक योजना दुर्गम भागातील जनतेसाठी – श्री जयानंद जाधव (बिरेश्वर क्रेडीट )
बांबवडे : दुर्गम भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बिरेश्वर को – ऑप क्रेडीट सोसायटी हि नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. बांबवडे तालुका शाहुवाडी येथील १५६ वी संस्थेची शाखा त्याच उद्देशाने निर्माण केली आहे. असे मत येथील बिरेश्वर को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. एकसंबा शाखा बांबवडे चे चेअरमन जयानंद जाधव यांनी उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
बांबवडे तालुका शाहुवाडी इथं बिरेश्वर को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. एकसंबा तालुका चिकोडी जि. बेळगाव या संस्थेची १५६ वी शाखा इथं उघडण्यात आली आहे. या संस्थेचे उद्घाटन सवते येथील रामदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी छोटेखानी समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहुवाडी- पन्हाळा विधानसभा मतदार संघाचे भाजप चे प्रभारी प्रवीण प्रभावळकर उपस्थित होते.
यावेळी प्रवीण प्रभावळकर यांनी संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाखा चेअरमन श्री जयानंद जाधव पुढे म्हणाले कि, संस्थेने अमुल्या योजनेसाहित ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, आणि दिव्यांग यांच्यासाठी ठेवींवर अर्धा टक्के जादा व्याज देनेचे ठरविले आहे.
संस्थेचे भागभांडवल चार हजार कोटी असून, सभासद ३,५९००० इतके आहेत. संस्था सभासदांना १५ % लाभांश देत आहे. संस्थेचे वैशिष्ठ्य म्हणजे येथील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. संस्थेकडे सुमारे ३,५००/- करोड रुपयांच्या ठेवी असून, कर्ज वाटप २,७००/-करोड इतके आहे. संस्थेचा २०२२-२३ नफा सुमारे ३५ करोड इतका आहे.यावरून संस्थेची आर्थिक स्थिती किती भक्कम आहे, याचा अंदाज येतो.
सदर ची संस्था चिकोडी चे खासदार आण्णासाहेब जोल्ले हे या संस्थेचे संस्थापक आहेत. तर आमदार सौ शशिकला जोल्ले या सह संस्थापिका आहेत. संस्थेचे चेअरमन श्री जयानंद जाधव हे असून, व्हा. चेअरमन सिद्राम गडदे हे आहेत.
कार्यक्रमास जि.प.सदस्य विजयसिंह बोरगे, बांबवडे गावाचे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले, बाळासाहेब कुलकर्णी, बाबुराव पाटील, डॉ.सुभाष पाटील, माजी सरपंच विष्णू यादव, विद्यानंद यादव ग्रा.सदस्य, थेरगाव मयूर चे अनिल पाटील, रवींद्र पाटील, साळशी चे प्रकाश पाटील विजय लाटकर, रामभाऊ कोकाटे शित्तूर तर्फ मलकापूर चे माजी सरपंच, पत्रकार रमेश डोंगरे, मुकुंद पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी केदार सटाले यांनी सूत्रसंचालन केले.