रेठरे चे उपसरपंच प्रणय जालिंदर पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न
बांबवडे : रेठरे तालुका शाहुवाडी चे उपसरपंच प्रणय जालिंदर पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न झाला.
यावेळी येथील विद्यामंदिर जोंधळेवाडी, विद्यामंदिर भराडवाडी, आणि विद्यामंदिर रेठरे येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त सैन्यदलातील निवृत्त सैनिकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याच अनुषंगाने चांगल्या जातीची सुमारे ३ वर्षे वयाची आंब्याची रोपे संग्रामसिंह घोडे पाटील यांच्यावतीने देण्यात आली. गावातील सार्वजनिक ग्रंथालय मध्ये पुस्तके आणि खुर्च्या देण्यात आल्या.
यावेळी शाहुवाडी पंचायत समिती चे माजी सदस्य जालिंदर पाटील व सभापती लातादेवी पाटील म्हणाले कि, आई वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा प्रणय आयुष्यात जपत आला आहे, आणि इथून पुढे सुद्धा जपत राहील.
या अनुषंगाने या वाढदिवस सोहळ्यास ग्रामपंचायत सरपंच सौ वंदना ठोंबरे, सदस्य शामराव जोंधळे, विजय परीट, ग्रामस्थ संभाजी इनामदार, विष्णू दळवी, शंकर निकम, दत्तात्रय परीट, तसेच विविध सामाजिक स्तरावरील मान्यवर या वाढदिवस सोहळ्यास उपस्थित होते.