शिवसेनेचे पांडुरंग वग्रे यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश : बांबवडे शिवसेनेला हादरा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पूर्वीचे पदाधिकारी पांडुरंग हरिबा वग्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
पांडुरंग वग्रे हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे कट्टर पाईक होते. त्यांनी आज दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी भाजप च्या कोल्हापूर कार्यालयात , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत , तसेच ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर व शाहुवाडी विधानसभा प्रमुख प्रवीण प्रभावळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला.
पांडुरंग वग्रे हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे कट्टर समर्थक समजले जात होते. परंतु संघटनेतील काही धुसफुसी मुळे जुन्या कार्यकर्त्यांना नेहमीच सापत्नपणाची वागणूक गेली. अनेक वर्षे दिली जात होती. कानामागून आली आणि तिखट झाली. अशी जुन्या कार्यकर्त्यांची भावना पांडुरंग वग्रे यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांकडून खाजगीत बोलले जात होते. यासाठी कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले. यामुळे कदाचित पांडुरंग वग्रे यांनी हा पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला असावा.
दरम्यान या पक्ष प्रवेशामुळे भाजप ला तालुक्यात भक्कम पाठींबा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.
याप्रसंगी बोलताना नाम. चंद्रकांत दादा पाटील यांनी आगामी होवू घालणाऱ्या सर्व निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी, तसेच पक्ष बळकट करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार च्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि नवीन प्रवेशकर्त्यांना आवाहन केले, याचबरोबर शुभेच्छा देखील दिल्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक काम करत बूथ स्तरापर्यंत पक्षाचे काम होण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन देखील नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
यावेळी शाहुवाडी तालुका अध्यक्ष विजय रेडेकर, सरचिटणीस संजय खोत, सुनील वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री पांडुरंग वग्रे आबा यांच्यासमवेत इम्तियाज शिकलगार, लियाकत नालबंद, दादासो वग्रे, शुभम तेली, श्रुकेश गवळी, प्रणव मांडवकर आदी कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.