बांबवडे ग्रामपंचायत च्या वतीने वृक्षारोपण संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील महात्मा गांधी विद्यालय मध्ये बांबवडे ग्रामपंचायत च्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. ” मेरी मिट्टी मेरा देश ” या अभियान अंतर्गत हे वृक्षारोपण बांबवडे चे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण संपन्न झाले.
यावेळी गावचे सरपंच भगतसिंग चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सावंत व विद्यार्थी यांच्या सहकार्याने हे वृक्षओपण झाले. यावेळी शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी देखील उपस्थित होते. यावेळी लाम्हण, पिंपळ, वड, बकुळ, अर्जुन, कदंबा, करंज, बहावा, निसकल सुगंधी, बर्ड चेरी, उलट अशोक, चिंच, बेल, रेन्त्री मोहगणी, उंबर या सावली देणाऱ्या वृक्षांच्या रोपांची लावण करण्यात आली आहे.
हे वृक्षारोपण सरपंच भगतसिंग चौगुले, उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, सदस्य सुरेश नारकर, दिपक निकम, दिलीप बंडगर, दिपक पाटील, विजय कांबळे, अमर निकम, मुकुंद प्रभावळे, पांडुरंग निकम, शरद निकम, दिग्विजय पाटील, शामराव कांबळे, ग्रामसेवक आर.बी. कुरणे, यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते.