बिरेश्वर क्रेडीट सोसायटी ग्राहकांची आर्थिक उन्नती करणार – श्री जयानंद जाधव
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं एकसंबा तालुका चिकोडी च्या बिरेश्वर को-ऑप क्रेडीट सोसायटी ची १५६ शाखा उघडण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन जयानंद जाधव एसपीएस न्यूज शी बोलताना म्हणाले कि, कोणतीही आर्थिक संस्था निर्माण होते, ती संस्थेची प्रगती करण्यासाठी, परंतु आमची संस्था सर्व सामान्य वर्गाच्या आर्थिक प्रगतीसाठी निर्माण झाली आहे. आणि त्यातही वैशिष्ठ्य म्हणजे महिलांसाठी अमुल्या योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये महिलांच्या गटांना सुरुवातीला दहा हजारापासून ते तीस हजारापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.
यावेळी श्री जाधव पुढे म्हणाले कि, संस्थेची स्थापना खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी १९९१ साली एकसंबा इथं केली. यातूनच सध्या संस्थेची स्वमालकीची इमारत तिथे आपल्याला उभी राहिलेली दिसेल.
संस्थेने ग्राहकांसाठी अनेक ठेव योजना राबविल्या आहेत. बसवज्योती ठेव, अक्षयज्योती ठेव, ज्योती ठेव, याचबरोबर रिकरिंग ठेव देखील संस्थेने राबविल्या आहेत. यामध्ये ठेवीदारांना सात ते नऊ टक्क्यांपर्यंत संस्था व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना अर्धा टक्का जादा व्याज देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
संस्था कर्जदारांना १४ ते १६ % व्याज आकारणी करते. इथं सोने तारण कर्ज देखील उपलब्ध आहे. याचबरोबर सभासद कर्ज, कॅश क्रेडीट कर्ज, बसवेश्वर क्रेडीट कार्ड कर्ज, वाहन कर्ज संस्था देत आहे.
याचबरोबर अनेक सुविधा संस्था देत आहे. त्यापैकी विमान तिकीट, रेल्वे तिकीट बुकिंग, डी मॅट कार्ड, पॅन कार्ड, एस.आय.पी.सेव्हिंग, अॅट पार चेक, सेफ डीपॉझीट लॉकर, फॉरेन करन्सी एक्स्चेंज यासहीत अनेक सुविधा आपल्या ग्राहकांना संस्था पुरवीत आहे.
अशी माहिती संस्थेचे चेअरमन जयानंद जाधव यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
आर.जी. कुंभार DGM, एस.के. माने DGM, बांबवडे शाखा प्रमुख अवधूत माळी, अविनाश अलासे कणेरी शाखा प्रमुख, राजू चौगुले हुपरी शाखा प्रमुख आदी मान्यवर संस्थेचा कारभार चोखरीत्त्या पहात आहेत.