संरक्षण दलातील जवानांना बांबवडे वासियांचा सलाम – सरपंच भगतसिंग चौगुले : ” मेरी मिट्टी, मेरा देश ” सोहळा संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ग्रामपंचायत च्यावतीने ” मेरी मिट्टी, मेरा देश ” या अभियान अंतर्गत शहीद जवानांना श्रध्दांजली व ज्यांनी आजतागायत देशाची सेवा केली. तसेच जे आजही सैन्यात आपले कर्तव्य बजावत आहेत. तसेच जे पोलीस दलात ज्यांनी सेवा बजावली आहे. अशा सर्व वीर जवानांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोनशीला बसविण्यात आली. त्या कोनशिलेचे उद्घाटन शहीद विष्णू पाटील यांच्या पत्नी तानुबाई पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
बांबवडे ग्रामपंचायत च्या वतीने हा सत्कार सोहळा ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाला.
या अगोदर विद्यामंदिर बांबवडे इथं कोनशीला उद्घाटन सोहळा झाला. त्यानंतर सर्व सुमारे ४८ निवृत्त सैनिक तसेच पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ” वीर जवान तुझे सलाम ” अशा घोषणा देण्यात आल्या.
ग्रामपंचायत सभागृहात माजी सैनिक, पोलीस कर्मचारी यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते शाल, फेटा, बुके श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले होते. तर प्रास्ताविक ग्रामसेवक आर.बी. कुरणे यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात सरपंच भगतसिंग चौगुले म्हणाले कि, सैनिक सीमेवर आपले प्राण तळहातावर घेवून आपल्या सीमांचे रक्षण करतात. म्हणून आपण , आपला देश सुरक्षित आहे. आपले पोलीस कर्मचारी समाजामध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत, म्हणून आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो. यासाठी या आजी-माजी संरक्षण दलातील जवानांचा सन्मान हि आपली कृतज्ञता आहे. त्यांच्या या समर्पणाला ग्रामपंचायत बांबवडे सलाम करीत आहे.
या कार्यक्रमास जे सैनिक आपल्या नेमून दिलेल्या ठिकाणी सेवा बजावत आहेत, त्यांचा मान त्यांचे आई- वडील यांना देण्यात आला.
यावेळी उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, सुरेश नारकर, दीपक निकम, विद्यानंद यादव, दिग्विजय पाटील, सौ मनीषा पाटील , वंदना बंडगर, सुनिता कांबळे, कविता प्रभावळे, शोभा निकम, सीमा निकम, कर्मचारी वृंद दीपक पाटील, प्रकाश निकम, महादेव कांबळे व कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील यांनी मानले.