बांबवडे : बांबवडे इथं भारत स्वच्छता अभियान अंतर्गत प्लास्टिक निर्मुलन प्रकल्प लवकरच निर्माण होणार असून, त्या प्रकल्पाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन संपन्न झाले.
निवडणुकीच्या वेळी दिलेल्या अभिवचनात ” स्वच्छ बांबवडे आणि प्लास्टिक मुक्त बांबवडे ” हे अभिवचन देण्यात आले होते. तसेच कचरा उचलणे थांबले होते. ते निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या एकाच आठवड्यात कचरा उचलाण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाही, काही विरोधक घंटागाडी दारात थांबलेली असतानाही, कचरा मात्र त्यात न टाकता रस्त्यावर टाकताना दिसत आहे. हि प्रवृत्ती थांबली पाहिजे, असे ग्रामपंचायत चे उपसरपंच स्वप्नील घोडे- पाटील यांनी सांगितले.
सध्या सुमारे १७ लाख रुपये खर्चाचा प्लास्टिक वर प्रक्रिया करणारा प्रकल्प जिल्हा परिषद च्यावतीने मंजूर झाला असून , तो फक्त बांबवडे साठी मंजूर झाला आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल. असेही श्री स्वप्नील घोडे-पाटील यांनी सांगितले.
यावेळी सरपंच भगतसिंग चौगुले , उपसरपंच स्वप्नील घोडे- पाटील, सदस्य सुरेश नारकर, दीपक निकम, दीपक पाटील, अमर निकम, शरद निकम, विजय कांबळे,शामराव कांबळे,मुकुंद पवार, मुकुंद प्रभावळे यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते.