बांबवडेत भर दुपारी आत्महत्या
बांबवडे:बांबवडे ता. शाहुवाडी येथील पेट्रोल पम्पासमोर सर्जेराव यशवंत पारिट यांच्या घरात राहत असलेल्या गोनू बाबू कोळापटे वय २६ वर्षे रा.बागवती गवळीवाडा ता.हरियाल,जि.कारवार (कर्नाटक) या कामगाराने राहत्या घरात गळफास लावून काल दि.२२/०८/२०२३ रोजी दु.३ च्या दरम्यान आत्महत्या केली.
सदर घटनेची शाहुवाडी पोलीस ठाण्यात नागराज लांबोरे यांनी नोंद केली आहे .
याबाबत शाहुवाडी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नागराज लांबोरे हे मुकादम असून त्यांच्याकडे गोनू बाबू कोळापटे हा कामास होता. आज दुपारी इतर कामगार आपले काम करीत असताना गोनू आपल्या बेडरूम मध्ये गेला त्याने बेडरूमच्या छताला असलेल्या हुकला बेड्शीट बांधून गळफास लावून घेतला. बराच वेळ झाल्याने गोनू बाहेर येत नही म्हणून इतरांनी दरवाजा वाजवला परंतु आतून कडी लावली होती. खूप वेळ झाल्याने दरवाजा तोडून आत गेल्यानंतर गोनूने गळफास लावल्याचे समजले.सदरची घटना दुपारी ३ च्या दरम्यान घडली आहे.
सदर घटनेचा तपास पी.एन.पावरा करीत असून सदर घटनेची माहिती कॉन्सटेबल दिपाली यादव यांनी दिली.