बांबवडे ट कोल्हापूर दुध संघाची संपर्क सभा संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ठमकेवाडी फाट्याजवळ राधेकृष्ण मंगल कार्यालय मध्ये कोल्हापूर जिल्हा सह. दुध संघाची संपर्क सभा आज दि.२३ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १.०० वाजण्याच्या दरम्यान खेळी मेळी च्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी दुध संघाचे चेअरमन श्री अरुण डोंगळे उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी केले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात कर्णसिंह गायकवाड म्हणाले कि, तालुक्यातील दुध संस्थांच्या तक्रारी तसेच सूचना मांडण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यातून दुध उत्पादकांच्या शंकांचे समाधान होईल. सुरुवातीला त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थितांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यानंतर विश्वास पाटील दुध संघाचे माजी चेअरमन यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, दुध उत्पादकांनी गायींपेक्षा म्हैशींचे दुध वाढविण्यावर भर द्यावा. पूर्वी म्हैशी ७० % तर गायी ३० % असायच्या. परंतु सध्या हे प्रमाण बदलले आहे. त्यामुळे दुध उत्पादकांना पैसे कमी मिळतात.
यावेळी अनेक दुध उत्पादकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकारी म्हणाले कि, सध्या पाऊसमान कमी असल्याने वैरण निकृष्ट दर्जाची मिळत आहे. त्याचा परिणाम दुध उत्पादनावर होत आहे. तसेच संघामार्फत २५% सबसिडी वर बियाणे मिळत आहे. त्याचा लाभ दुध उत्पादकांनी घ्यावा. येणाऱ्या रब्बी हंगामासाठी शाळू चा वापर करावा. तसेच मका जनावरांना आवडणारे खाद्य आहे.त्याचा वापर करण्यात यावा. तसेच साय्लेज बॅग चा वापर कुट्टी साठवण्यासाठी करावा.
तसेच लाम्पी आजारासाठी डॉक्टर मंडळींचे प्रमाण कमी आहे. तसेच जनावरांना औषध पुरवठा संघाकडून कमी होतोय. त्यावर उपाय योजना कराव्यात.
दुध उत्पादकांच्या प्रश्नांना चेअरमन डोंगळे यांनी उत्तरे दिलीत.