जालना येथील अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बांबवडे कडकडीत बंद
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथ सकल मराठा समाज यांच्यावतीने आज दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला.
जालना इथं मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या मोर्चावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच सरकारने घेतलेल्या भूमिकेसंदर्भात हा बंद पाळण्यात आला.
आजवर मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीकरिता अनेक मूक मोर्चे मोठ्या संख्येने कोणतेही गालबोट न लावता संपन्न केले. याहीवेळी मोर्चा शांततेच्या मार्गाने नियोजित होता. परंतु पोलिसांनी केलेला बळाचा वापर हा निषेधार्ह आहे. याचे प्रतिक म्हणून आज कोल्हापूर शहर बंद आहे. त्याचप्रमाणे बांबवडे देखील कडकडीत बंद केले गेले.