कंदलगाव मध्ये कृषी कन्यांचा कार्यानुभव उपक्रम संपन्न
बांबवडे : कंदलगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्यावतीने ग्रामीण ( कृषी ) जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषी कन्यांनी गावातील नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करण्याकरिता व शेतकऱ्यांच्या समस्या ओळखण्यासाठी आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी तसेच कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध योजनांचा अभ्यास केला.
या कार्यानुभव कार्यक्रमांचा प्रारंभ कृषी कन्यांनी ग्रामविकासासाठी लोकसहभाग या कार्यक्रमाने केला. या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत परिसरामध्ये गावाचा नकाशा कृषी कन्यांनी रांगोळीच्या सहाय्याने रेखाटला.
या रांगोळी द्वारे कंदलगाव गावातील ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, विविध पतसंस्था, तसेच खत प्रकल्प, पाणीपुरवठा केंद्र, विविध सांकेतिक चीन्हांद्वारे दर्शविला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यामंदिर कंदलगाव येथील विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी नकाशा वाचनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रत्याक्षिकांमध्ये गावचे सरपंच राहुल पाटील, उपसरपंच सतीश निर्मळ, कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत सदस्य, तसेच इतर कर्मचारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते. त्यांनी कृषी कन्यांना या कार्यक्रमाबद्दल प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमासाठी रा. छ.शा.म. कृषी महाविद्यालय कोल्हापूर चे सहयोगी अधिष्ठाता सूर्यवंशी सर, कार्यक्रम अधिकारी शिक्षिका एस.ए. सरवदे, समन्वयक डॉ. बी.टी. कोलगणे, यांचे मार्गदर्शन लाभले.
येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कु.वेदिका आळवेकर, आकांक्षा आंधळे, अंजना हरिकृष्णन, अंकिता बगाटे, पायाल बंडगर,निकिता बर्गे या कृषी कन्यांचा समावेश आहे.