बांबवडे अंगणवाडी क्र.१९१ इमारती चा लोकार्पण सोहळा संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं अंगणवाडी क्र. १९१ इमारतीचा लोकार्पण सोहळा लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले व महिला बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका अश्विनी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
बांबवडे इथं अंगणवाडी चे विद्यार्थी भाड्याच्या इमारतीत बसत होते. त्याच अनुषंगाने बांबवडे ग्रामपंचायत ने या इमारती चा निधी जिल्हा वार्षिक योजना व १५ वा वित्त आयोग ग्रामीण स्तर मधून मंजूर करून आणला होता. या इमारतीसाठी सुमारे साडे आठ लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजने मधून मंजूर झाला होता. परंतु हा निधी मागील बजेट मध्ये मंजूर झाला होता. परंतु सध्या त्याची किमत अधिक झाल्याने उर्वरित निधी १५ व्या वित्त आयोगातून मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी सौ.अश्विनी पाटील म्हणाल्या कि, इमारती चे काम सुंदर रीत्त्या पूर्ण केले असून, कोणतीही कमतरता या बांधकामात नाही. तसेच हे काम वेळेत पूर्ण केले असून ग्रामपंचायत बांबवडे चे अभिनंदन .
हि इमारत उभी करण्यासाठी मुकुंद प्रभावळे, दीपक पाटील यांनी अधिक परिश्रम घेतले.
यावेळी विद्यामंदिर बांबवडे चे मुख्याध्यापक जयसिंग पाटील सर , अंगणवाडी सेविका श्रीमती सुमन यादव, वंदना कांबळे, आक्काताई सुतार, भारती वग्रे मदतनीस सीमा निकम, सीमा म्हाऊटकर, सविता कांबळे, कमल वाघमारे, विद्याराणी बंडगर, या अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.
तसेच उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, विद्यानंद यादव, सुरेश नारकर, दीपक निकम, अमर निकम, विजय कांबळे, भीमराव मुडशिंगकर, संजय पाटील, दिलीप बंडगर, राहुल भोजे आदी मंडळी यावेळी उपस्थित होती.