लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये शिक्षकदिन संपन्न
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली तालुका शिराळा जि. सांगली या विद्यामंदिर मध्ये ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिन संपन्न करण्यात आला.
५ सप्टेंबर हा दिवस भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक गवळी सर तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमधून बनविण्यात आलेले मुख्याध्यापक श्रेयस पाटोळे, उपमुख्याध्यापक अफनान सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमावेळी प्रतीक्षा पाटील ( ८ वी ) या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. कु. अपेक्षा पाटील, श्रेया गायकवाड, अक्षरा पाटील, आराध्या गावडे, नीरज कुरणे, तनिष्क कांबळे, साईराज साळुंखे, अथर्व कांबळे, शंभूराज फार्ने, श्रेयस पाटोळे, अफनान सुतार या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या भूमिकेतून मनोगते व्यक्त केलीत.
तसेच शिराळकर मॅडम, भोसले मॅडम, दिवे मॅडम, मुख्याध्यापक गवळी सर यांनी मनोगते व्यक्त केलीत. व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
आजच्या दिवशी ६ वी, ७ वी, ८ वी च्या विद्यार्थ्यांनी बालवाडी ते पाचवी च्या वर्गावर अध्यापन केले. शिक्षक बनण्याचा आनंद घेतला.
अशाप्रकारे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर यशवंतनगर चिखली इथं शिक्षकदिन संपन्न झाला.