उद्या कॉंग्रेस ची जनसंवाद यात्रा सुपात्रे-ठमकेवाडी फाटा
बांबवडे : उद्या दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी बांबवडे पंचक्रोशीत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद यात्रा शाहुवाडी तालुक्यात दाखल होणार आहे. या यात्रेचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील करीत आहेत
शाहुवाडी तालुक्यात गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड हे यात्रेचे स्वागत करणार आहेत. शाहुवाडी तालुक्यात सुपात्रे, खुटाळवाडी, डोणोली, बांबवडे, ठमकेवाडी, अशी हि जनसंवाद यात्रा असणार आहे. या यात्रेला जनतेने उदंड प्रतिसाद देत यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष सुभाषराव इनामदार व महिला आघाडी प्रमुख सौ वैशाली सुभाषराव बोरगे यांनी केले आहे.