” औद्योगिक क्रांती ” चे पर्व नेटाने पुढे नेवू – श्री मानसिंगराव गायकवाड दादा
बांबवडे :उदय सह. साखर कारखाना लि. बांबवडे-सोनवडे चे चेअरमन श्री मानसिंगराव गायकवाड दादा यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
कोल्हापूर जिल्ह्याचे एकेकाळचे भक्कम नेतृत्व असलेले स्व. उदयसिंगराव गायकवाड यांनी दिलेली जनसेवेची शिदोरी आज देखील श्री. मानसिंगराव गायकवाड दादा यांनी जोपासली आहे. एवढेच नव्हे,तर ती शिदोरी त्यांनी पुढच्या पिढीकडे म्हणजेच कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक श्री रणवीरसिंग गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केली आहे. तेदेखील बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अडी-अडचणी दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहेत.
आजचा मानसिंगराव गायकवाड दादा यांचा वाढदिवस सर्व सामान्य जनता उत्साहाने साजरा करीत आहे. तालुक्यात सुरु केलेले औद्योगिक क्रांतीचे पर्व यापुढे नेटाने पुढे नेवू. असे वक्तव्य श्री मानसिंगराव गायकवाड यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले.