कोल्हापूर जिल्हास्तरावरील कराटे स्पर्धेत लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर ची गरुडझेप
शिराळा प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हास्तरावर झालेल्या कराटे स्पर्धेत शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी दोन गोल्ड, ३ सिल्वर, तर ८ ब्रांझ मेडल पटकावत विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेतली आहे.
विद्यामंदिर मधील तनिष्क सतीश कांबळे, श्लोक मातेस विभूते या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल्स, तसेच सृष्टी शशिकांत पाटील, पृथ्वी युवराज माने, सिल्वर मेडल्स, सिद्धेश गायकवाड, अनुज गोळे, शुभम पाटील, आराध्या हावळे, कार्तिकी पाटील, त्रिषा लाड, समीक्षा माळी, निशिता कांबळे ब्रांझ मेडल्स पटकावले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक वृंदाने अभिनंदन केले.