” गोकुळ ” च्या माध्यमातून तालुक्यात दुधाची ” धवलक्रांती ” निर्माण करणार – कर्णसिंह गायकवाड
बांबवडे : स्व.आम. संजयसिंह गायकवाड यांचे चिरंजीव आणि गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
कर्णसिंह गायकवाड म्हणजे तरुणाई च्या गळ्यातील ताईत म्हणावयास हरकत नाही. स्व.आम. संजय दादा यांच्या पाउलखुणांवर आपला मार्गक्रमण करीत असलेलं नेतृत्व नेहमीच जनतेला भावंत आलं. गोकुळ च्या संचालक पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने पुन्हा जनसेवेची संधी मिळाली.
यावेळी कर्णसिंह गायकवाड एसपीएस न्यूज शी बोलताना म्हणाले कि, गोकुळ च्या माध्यमातून तालुक्यात दुधाची धवलक्रांती निर्माण करणार आहोत. भविष्यात दुध उत्पादकांच्या खिशात आगाऊ पैसे कसे जमा होतील, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत.
पुनश्च कर्णसिंह गायकवाड यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.