बांबवडे विद्यामंदिर च्या गेट च्या आत गांजा सेवन करताना पाच जणांना अटक : शाहुवाडी पोलिसांची धडक कारवाई
बांबवडे : बांबवडे केंद्र शाळा बांबवडे तालुका शाहुवाडी च्या गेट च्या आतील बाजूस गांजा चे सेवन करताना, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. याबाबत बांबवडे पंचक्रोशीतून पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली हकीकत अशी कि, दि ८ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजनेच्या दरम्यान बांबवडे च्या प्राथमिक विद्यामंदिर च्या गेट च्या आतमध्ये आडोशाला हे पाच आरोपी सिगारेट मधून गांजाचे सेवन करताना आढळून आले.
यावेळी विशाल गुंगा जानकर वय ३४ वर्षे, योगेश आनंद सुतार वय २७ वर्षे, श्रीराम भानुदास साठे वय २५ वर्षे तिघेही रहाणार बांबवडे, आर्यन दीपक सावंत वय १९ वर्षे, रहाणार मलकापूर तालुका शाहुवाडी, शुभम दगडू निंबाळकर वय २० वर्षे, रहाणार बोरीवडे, तालुका पन्हाळा अशा पाच जणांना शाहुवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
हि मोहीम पोलीस निरीक्षक राजेंद्र सावन्त्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी हि मोहीम फत्ते केली. त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल बांबवडे तील ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.