यशराज चे मालक ओंकार कदमबांडे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ” यशराज ऑप्टीकल्स ” चे मालक ओंकार कदमबांडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
ओंकार कदमबांडे आणि बांबवडे चे नाते सुमारे १५ वर्षांपासून आहे. एक संयमी आणि स्मितहास्य असलेलं हे व्यक्तिमत्व नेहमीच सर्वांना भावंत आलं. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य समोरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान देवून जाते.
नेहमीच सर्वांच्या उपयोगाला पडणारे व्यक्तिमत्व आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना, प्रसन्न आहे. हे आमच्यासारख्या मंडळींना समाधान देवून जाते. ओंकार व त्यांचे बंधू मयूर हे दोघेही कष्टाळू असून, कर्म हेच आपले दैवत म्हणून कष्ट करताना, आम्ही नेहमीच पहात आलोय. कष्ट करताना, आणि व्यवसाय करताना, तो सचोटीचा असावा, याकडे या मंडळींचे बारीक लक्ष असते. ग्राहकाला सल्ला देताना, तो केवळ स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी नसून तो ग्राहकाच्या भल्यासाठी असतो. त्यांचे हे गुण त्यांच्या व्यवसाय वृद्धी साठी उपयोगाला पडत असावा.
अशा या दोन्ही बंधूंपैकी ओंकार यांचा वाढदिवस निश्चितच त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरल्याशिवाय रहाणार नाही. आयुष्यात व्यवसाय अनेक मंडळी करतात. परंतु तो सचोटीचा असावा, हे मात्र सगळ्यांकडे पहायला मिळत नाही. म्हणून पुनश्च त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.