येळाणे च्या सिद्धार्थ दुध संस्थेत ४ लाख ३२ हजारांचा अपहार
बांबवडे : येळाणे तालुका शाहुवाडी इथं सिद्धार्थ मागासवर्गीय सह. दुध व्याव. संस्थेच्या संचालकांनी बनावट कागदपत्रे सादर करून सुमारे ४ लाख ३२ हजार रुपयांचा अपहार केला असल्याची घटना घडली आहे. सदर बाबत शाहुवाडी पोलीस ठाणे इथ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेबाबत लेखापरीक्षक उषा अरुण जाधव यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१ एप्रिल २०१७ ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत संचालकांनी दुध संस्थेत बनावट कागदपत्रे तयार करून, ४ लाख ३२ हजार रुपयांचा अपहार केला आहे. याबद्दल संस्थेच्या सोळा संचालकांवर दोषारोप ठेवण्यात आले आहेत.