भविष्यात इतिहास घडविणारी नवी पिढी : श्री विजय लाटकर
बांबवडे : शिवसेनेचे ठाकरे गटाचे शाहुवाडी तालुका उपप्रमुख श्री विजय लाटकर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या भगव्या शुभेच्छा.
शाहुवाडी तालुक्यात शिवसेना हि फार काळापासून आपली मुळे घट्ट रोवून आहेत. ती कशामुळे, तर निष्ठावंत शिवसैनिकांमुळे. त्यांचा या निष्ठेने सह्याद्रीचा परिसर बहुतांशी भगवा झाल्याचे आपणास पहायला मिळाला आहे. विजय लाटकर हेदेखील नवोदित कार्यकर्ते असले, तरी निष्ठा मात्र सह्याद्रीसम आहे. असे एकंदरीत आजवर त्यांच्या राजकीय प्रवासातून दिसून येते.
प्रत्येक आंदोलनात विजय लाटकर हे नेहमीच आघाडीवर असलेले आपल्याला पहायला मिळालेले असतील. भगवा ध्वज आणि मुळच्या शिवसेनेवर असलेले प्रेम तुम्हाला त्यांच्या वागण्यातून दिसून येईल. स्व. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेली हि नवी पिढी एक दिवस नक्कीच इतिहास घडवतील. कारण इतिहास घडवणे हे या मातीचा गुण आहे. इथं शिळ्या भाकरीबरोबर चटणी खाणारी मंडळी मिळतील, परंतु निष्ठेला धक्का लावू देणार नाहीत.
अशाच मंडळींपैकी हे नवं कोरं नेतृत्व आहे. भविष्यात शिवसेनेसाठी खास इतिहास घडविल्याशिवाय हे व्यक्तिमत्व रहाणार नाही.
पुनश्च विजय लाटकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.