” यशराज ऑप्टीकल्स ” च्या वतीने बांबवडे त घरगुती गणपती सजावट स्पर्धा
बांबवडे : ” यशराज ऑप्टीकल्स ” बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्यावतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. अशी माहिती यशराज ऑप्टीकल्स चे मालक ओंकार कदमबांडे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
बांबवडे नगरीत प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, बांबवडेकरांसाठी हि एक पर्वणी ठरणार आहे. हि स्पर्धा २३ सप्टेंबर पर्यंतच असणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या घरगुती गणपतीच्या सजावटीचा फोटो तसेच सहकुटुंब आरती करताना चा फोटो यशराज ऑप्टीकल्स च्या क्रमांकावर व्हॉटस अॅप वर पाठवायचा आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २४ सप्टेंबर रोजी बांबवडे इथं करण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी त्वरित आपली नाव नोदणी यशराज ऑप्टीकल्स च्या क्रमांकावर करायची आहे.