मेडिकल चा कचरा इतस्तत: सापडल्यास कायदेशीर कारवाई करणार -सरपंच भगतसिंग चौगुले
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सर्वच हॉस्पिटल, दवाखाने यांच्या डॉक्टर्स मंडळींनी आपले मेडिकल वेस्टेज ची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी, जेणेकरून याचा उपद्रव ग्रामस्थांना होणार नाही. अशी सूचना बांबवडे चे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले यांनी बांबवडे परिसरात असणाऱ्या हॉस्पिटल्स व दवाखाने यांना दिली.
दवाखान्यातील वेस्टेज मटेरियल ची योग्य विल्हेवाट लावावी, याची सूचना देण्यासंदर्भात तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासंदर्भात बांबवडे ग्रामपंचायत मध्ये बैठक संपन्न झाली. बैठकीचे निमंत्रण सरपंच भगतसिंग चौगुले यांनी दिले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी एच.आर. निरंकारी होते.
सरपंच याविषयी बोलताना पुढे म्हणाले कि, दवाखान्याची वेस्टेज ची काळजी दवाखाने आणि हॉस्पिटल यांनी घ्यावी. असे असतानाही काही ठिकाणी सदर चे ढीग आढळून आले आहेत. यापुढे असे काही घडल्यास संबंधित दवाखाने व हॉस्पिटल्स यांना ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत कडून दिले जाणार नाही. तसेच हॉस्पिटल्स व दवाखाने इथ येणाऱ्या रुग्णांशी तसेच कोणत्याही अधिकाऱ्याशी, लोकप्रतिनिधींशी सौजन्याने वागावे.येणाऱ्या रुग्णांकडून अवाजवी फी वसूल केली जावू नये. अशा सूचना देखील सरपंच यांनी दिल्या.
यावेळी बोलताना तालुका वैद्यकीय अधिकारी श्री निरंकारी म्हणाले कि, मेडिकल वेस्टवेअर साठी खाजगी संस्था कार्यरत असून, तुमचे मेडिकल वेस्ट वेअर त्या वाहनामध्ये टाकून पुढे पाठवून द्यावे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
यावेळी डॉक्टर्स मंडळींकडून मेडिकल वेस्ट वेअर चे वाहन प्रत्येक आठवड्यात नियमितपणे येत नसल्याची तक्रार देखील केली. दरम्यान पुन्हा असे वेस्ट वेअर कोणीही बाहेर टाकू नये, असे मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. जयवंत पाटील यांनी सांगितले.
बैठकीचे आभार दिलीप बंडगर यांनी मानले.