यंदा उदय साखर सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार – श्री मानसिंगराव गायकवाड दादा चेअरमन
बांबवडे : उदय सह. साखर कारखाना यंदाच्या २०२३-२४ या वर्षाचे सुमारे सात लाख मेट्रिक टनाच्या गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. तसेच डीस्टीलरी विभाग देखील यंदा दीड लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. असा विश्वास उदय साखर चे चेअरमन श्री मानसिंगराव गायकवाड दादा यांनी व्यक्त केला.
आज दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी साखर कारखान्याची २९ वी सर्व साधारण सभा संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून चेअरमन श्री मानसिंगराव गायकवाड दादा बोलत होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक पंडित शेळके सर यांनी केले. सभेचे अहवाल वाचन कार्यकारी संचालक श्री भगवान पाटील यांनी केले.
यावेळी श्री मानसिंगराव गायकवाड दादा पुढे म्हणाले कि, गेली २९ वर्षे या कारखान्याने संघर्ष केला असून, याला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळेच या संघर्षाला यश प्राप्त झाले आहे.
कारखान्याच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. भविष्यात सुद्धा या औद्योगीकरणाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय रहाणार नाही. यावेळी बोलताना दादा पुढे म्हणाले कि, कारखाना कार्यस्थळावर कामगार आणि सभासदांसाठी पन्नास बेड चे हॉस्पिटल निर्माण करणार आहोत. जेणेकरून कारखान्यावर अपघात झाल्यास कर्मचाऱ्यांना तातडीने उपचार उपलंध होतील. तसेच या कारखान्याची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली, असे माजी खासदार स्व. उदयसिंगराव गायकवाड यांच्या पुतळ्याचे अनावरण दि. २ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात येईल.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा कारखान्याचे संचालक रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, या कारखान्याने खूप संघर्ष भोगला असून, भविष्यात या कारखान्यास उर्जितावस्था लाभल्याशिवाय रहाणार आहे. उदय साखर कारखाना हा जिल्ह्यात एक नंबर चा कारखाना म्हणून नावलौकिक मिळवल्याशिवाय रहाणार नाही. हा माझा शब्द आहे. असेही श्री रणवीरसिंग गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ संचालक महादेवराव पाटील साळशीकर, प्रकाश कांबळे करुंगळेकर यांनी मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमाचे आभार संचालक अजित पाटील शिंपे यांनी मानले.