भारतीय दलित महासंघाच्या वतीने खाजगीकरण परिपत्रकाची बांबवडे इथं होळी
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं भारतीय दलित महासंघाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या खाजगीकरण व कंत्राटीकरण करण्याच्या शासकीय परिपत्रकाची बांबवडे इथ होळी करण्यात आली. तसेच सदर चे शासकीय परिपत्रक त्वरित मागे घ्यावे,अशा आशयाची विनंती करणारे निवेदन बांबवडे येथील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना देण्यात आले.
शासनाने शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांसह शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खाजगीकरण करण्यासाठी मान्यता दिली आहे. सदरचा निर्णय हा घटनाबाह्य असून, भांडवलदारांचे हित जोपासणारा आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
भारतीय संविधान व शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करायचे सोडून, राज्य सरकार शिक्षण व्यवस्थेचे खाजगीकरण करत आहे. परिणामी सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहाणार आहे. शासन खाजगीकरणा द्वारे उद्योगपती, भांडवलदार, व राजकीय दलाल यांच्या हिताची धोरणे अवलंबित आहेत.
त्यामुळे हे निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावेत, अशा आशयाचे निवेदन भारतीय दलित महासंघाच्या वतीने देण्यात आले आहे. सदर च्य निवेदनावर अनिरुद्ध गौतम कांबळे, दयानंद कांबळे, आकाश कांबळे, विक्रमसिंह समुद्रे, दयानंद शिवजातक, मानसिंग आडके, प्रदीप माने, किरण कांबळे, सिद्धार्थ बनसोडे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.