सामाजिक

यशराज ऑप्टीकल्स ची घरगुती आरास स्पर्धा संपन्न : प्रथम क्रमांक साळशी च्या सुशांत पाटील यांनी पटकावला

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील यशराज ऑप्टीकल्स चे मालक ओंकार व मयूर कदमबांडे यांनी आयोजित केलेल्या घरगुती आरास स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, या स्पर्धेत साळशी तालुका शाहुवाडी येथील सुशांत संजय पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.


यंदा च्या गणेशोत्सवात यशराज ऑप्टीकल्स च्या वतीने घरगुती आरास स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत तालुक्यातून १५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्क्रामाचे अध्यक्ष बांबवडे चे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कानसा- वारणा फौंडेशन चे अध्यक्ष दीपकदादा पाटील, एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार, व सामाजिक कार्यकर्ते बयाजी पाटील आप्पा हे होते. विजेत्या स्पर्धकांना चषक,भेटवस्तू, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, तर उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चहापानाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेमध्ये मलकापूर चे रुपेश वारंगे यांनी द्वितीय क्रमांक, दीपमाला सूर्यवंशी तृतीय क्रमांक, योगेश महाजन चतुर्थ क्रमांक, शिवारे चे संग्राम पाटील यांचा पाचवा क्रमांक आला आहे. या व्यतिरिक्त उत्तेजनार्थ म्हणून पाच क्रमांक काढण्यात आले. यामध्ये बांबवडे चे विक्रम पाटील यांचे चिरंजीव साईवर्धन पाटील यांचा क्रमांक आला आहे. या तरुण मुलाने मांसाहार वर्ज्य करीत वैष्णव धर्माची पताका आपल्या खांद्यावर उचलली आहे. त्याने साक्षात विठ्ठलामध्ये गणेश मूर्तीचा देखावा साकारला होता. ऐन तरुण वयात मुले धाब्यावर जेवणे पसंत करतात, परंतु साईवर्धन ने घेतलेली वैष्णव धर्माची पताका समाजाला मार्गदर्शक ठरत आहे.


यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच भगतसिंग चौगुले यांनी या घरगुती आरास उपक्रमाचे कौतुक अरीत ओंकार व मयूर कदमबांडे यांचे अभिनंदन केले. यावेळी दीपकदादा पाटील यांनी सुद्धा कदमबांडे परिवाराचे कौतुक करीत अभिनंदन केले. व उपस्थितांना आरती संग्रहाचे वाटप केले.
यावेळी मुकुंद पवार म्हणाले कि, समाजाला अशा उपक्रमांची गरज असून लोक भक्तिमार्गात तल्लीन व्हावेत. तसेच प्रत्येक स्पर्धकाने आपल्या कल्पकतेतून साकारलेली आरास समाजासमोर ठेवण्याचे काम कदमबांडे बंधूंनी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.


यावेळी संजय पाटील, रुपेश वारंगे यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी उपस्थितांचे यथोचित सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार कदमबांडे यांनी केले, तर आभार मायर कदमबांडे यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!